शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्या करिता या 5 गुरुमंत्राचा वापर करा.Share Market 5 Tips Guide in Marathi

Share Market Tips Guide in Marathi:वाचक बंधुनो शेअर मार्केटच्या या भुलभुलैया विश्वात तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्ट केलेल्या इन्व्हेस्टमेंट्स ची चिंता वाटतेय का?

का आपल्याला नेमक्या कोणत्या स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करावी? हा यक्ष प्रश्न तुमच्या समोर आहे, आणि आता कळत नाहीये नेमके काय करावे ? असे असेल तर आता काहीच काळजी करू नका या पुढील 5 गुरुमंत्राचा वापर आपण शेअर मार्केट गुंतवणूकीत केलात तर हमखास यश तुमचेच आहे चला तर मग सुरुवात करुयात व पाहुयात गुंतवणूकीच्या त्या 5 यशस्वी टिप्स कोणत्या आहेत..

Share Market Tips Guide in Marathi शेअर मार्केट टिप्स
Designed by Freepik

गुंतवणूकदारांनो शेअर मार्केट मध्ये नेमका कोणता स्टॉक विकत घ्यावा जो आपणांस भविष्यात चांगले रिटर्न्स देऊ शकेल हे जर आपणांस समजत नसेल तर आपण Mutual Fund किंवा ETF या पर्यायांचा विचार करू शकता.. कारण शेअर मार्केट मध्ये जवळपास 7000 पेक्षाही जास्त कंपन्या listed आहेत, यातून नेमक्या कोणत्या कंपनीचे स्टॉक्स विकत घ्यावे किंवा यात गुंतवणूक करावी हे आपणांस सहजा सहजी कळणार नाही कारण त्या करीता त्या सर्व कंपनीच्या मागील काळातील ट्रॅक रेकॉर्ड पाहूनच आपल्याला सखोल अभ्यास करूनच यात इन्वेस्ट करावी लागेल किंवा ब्रोकरची मदत आपल्याला या कमी आपल्याला घ्यावी लागेल यात तुमचा पैसा व वेळ जाणार हे मात्र निश्चित आहे. परंतु जर आपण दूसरा पर्याय म्हणजे Mutual Fund किंवा ETF मध्ये लॉन्ग टर्म करीता आपले पैसे यात इन्वेस्ट केले तर आपणांस चांगले रिटर्न्स हे निश्चित मिळतील.

शेअर मार्केटमध्ये नेहमीच नाट्यमय चढउतार पाहायला मिळतात आणि त्यातल्या त्यात बातम्यांमध्ये सतत निगेटिव्ह वातावरण शेअर मार्केट बाबतीत चित्रित केल्या जाऊ शकतात त्यामुळे आपणांस भिती वाटणे साहजिकच आहे व त्यातून आपण एखाद्या वेळेस आपले स्टॉक्स किंवा Mutual Fund हे विकण्यास तयार होता व स्वतः चा तोटा करून घेता.किंवा आपण भावनिक होऊन एखाद्या चुकीच्या स्टॉक्स मध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करता व आर्थिक नुकसानीस बळी पडता आपण त्या बातम्यांची सत्यता पाहत नाही व अविचाराने व भीतीने लगेच स्टॉक विकता.असे अजिबात करू नका शेअर मार्केटच्या तात्कालिक चढ उतारांनी तुमचे निर्णय डळमळू देऊ नका.

Share Market Tips Guide in Marathi
Designed by Freepik

लॉन्ग टर्ममध्ये Share Market हे बुलीश पद्धतीने नेहमीच वर गेलेले आहे. परंतु शॉर्ट टर्म मध्ये या मध्ये घसरण पाहायला ही मिळते. जरी शॉर्ट टर्ममध्ये घसरण होत असली तरी तुमच्या लॉन्ग टर्मच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करीत राहिल्याने या अडचणी दूर होतील . हे नेहमी लक्षात ठेवा की ,लॉन्ग टर्ममध्येच शेअर मार्केटमध्ये पैसे बनतात. म्हणून तात्कालिक चढउतारांनी तुमचे निर्णय डळमळू देऊ नका. लॉन्ग टर्म गुंतवणूक करा.

शेअर मार्केट मध्ये टिकून राहून आपली संपत्ती तयार करणे ही सोपी गोष्ट नाही त्या करिता आपल्यात खूप पेशन्स ची गरज आहे त्या करिता शेअर मार्केट चे वातावरण कसेही असुद्यात (अनुकूल वा प्रतिकूल) तुम्हाला सातत्याने या मध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत हे लक्षात असूदयात.,त्या करिता आपण Cost Averaging म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्धतीचा वापर करा.. या पद्धतीमुळे तुम्ही विविध किंमती मध्ये स्टॉक्स खरेदी करू शकता किंवा Mutual funds चे यूनिटस विकत घेऊ शकता.

Cost Averaging पद्धत म्हणजे शेअर मार्केट खाली आले की जास्त stocks किंवा Mutual funds युनिट विकत घेता येतील , याविरुद्ध मार्केट वर गेले की तुम्हाला कमीstocks आणि Mutual funds युनिट मिळू शकतात. परंतु आपली investment ही लॉन्ग टर्ममध्ये असेल तर या किंमती Average होवून जातील . त्यामुळे आज मार्केट वर आहे नंतर पैसे इन्वेस्ट करेन किंवा मार्केट अजून खाली येऊदेत मग इन्वेस्ट करेन. अस करणे बंद करा आणि नियमितपणे पैसे इन्वेस्ट करत रहा. 

लक्षात असूद्यात की,आपण आज लावलेले हे गुंतवणूकीचे छोटेशे रोपटे कालांतराने याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतरण होणार आहे हे नेहमीच लक्षात असूदयात..ती म्हण आहे ना ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणी प्रमाणे आपली दर महिन्याची इन्व्हेस्टमेंट ही आपल्या भविष्याची शिदोरी ठरणार आहे…

शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन यशस्वी गुंतवणूकदार होण्या करिता ‘संयम’ हा सर्वात महत्वाचा गुण आहे. अनेक नवीन गुंतवणूकदार हे त्वरित श्रीमंत होण्याच्या आशेने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करतात आणि लवकरच निराश होतात. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक आहे,की शेअर मार्केट हा एक दीर्घकालीन खेळ आहे आणि यशस्वी होण्यासाठी शिस्त आणि धैर्य आवश्यक आहे.

शेअर बाजारात यशस्वी होणे सोपे नाही, परंतु अशक्यही नाही. वरील 5 टिप्स तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासात मदत करतील.

शेअर मार्केट मध्ये संयमीपणाने शिस्त बद्ध राहणे फारच गरजेचे आहे, त्वरित श्रीमंत होण्या करिता शेअर मार्केट मध्ये भावनिक होऊन एखादा चुकीचा निर्णय घेऊ नका ,मार्केटचा सखोल अभ्यास करूनच योग्य निर्णय घ्या व आपली गुंतवणीक ही लॉन्ग टर्म साठी निश्चित करा,आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्या अगोदर , आपल्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांचा आणि जोखीम सहनशीलतेचा काळजीपूर्वक विचार करा.

शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकी करिता आपणांस शुभेच्छा!

शेअर मार्केट मध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीच्या टिप्स :

1.अगोदर हे ठरवा की तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीतून काय साध्य करू इच्छिता? (उदा. निवृत्ती, शिक्षण, किंवा घर खरेदी)

तुमचे गुंतवणुकीचे ध्येय निश्चित केल्याने तुम्हाला तुमची गुंतवणूकीची रणनीती आणि गुंतवणुकीचे क्षितिज ठरवण्यास मदत होईल.

2.तुमची जोखीम घेण्याची क्षमता किती आहे हे तपासा :

तुम्ही गुंतवणुकीत किती जोखीम घेऊ शकता ? हे अगोदर निश्चित करा

तुमची जोखीम सहनशीलता ही तुमच्या वयावर, तुमच्या आर्थिक परिस्थितीवर व गुंतवणुकीच्या क्षितिजावर अवलंबून असते. कमी जोखीम सहनशील असलेल्या गुंतवणूकदारांनी कमी अस्थिर गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी, तर जास्त जोखीम सहनशील असलेले गुंतवणूकदार अधिक अस्थिर गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करू शकतात.

3. तुम्ही स्वतः संशोधन करा:

तुम्ही ज्या कंपनी मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात त्या कंपनीचा सखोल असा अभ्यास करा.कंपनीचे वित्तीय विवरण, व्यवसाय मॉडेल आणि स्पर्धात्मक परिस्थिती समजून घ्या. फक्त नावावर किंवा टिप्सवर गुंतवणूक करू नका.

4. तुमच्या गुंतवणूकीत विविधता आणा :

तुमची गुंतवणूक विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये आणि उद्योगांमध्ये पसरवा.असे केल्याने तुमचे जोखीम कमी होण्यास मदत होईल.तुम्ही म्युच्युअल फंड किंवा एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ) सारख्या विविधतापूर्ण गुंतवणुकीच्या साधनांचा वापर करू शकता.

5. गुंतवणूकीत कायम शिस्त बाळगा:

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी शिस्त आणि धैर्य आवश्यक आहे.बाजारातील अस्थिरतेमुळे घाबरून बाजारातून बाहेर पडू नका.तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून विचार करा.

तर मग वाचक बंधुनो आमची आजची पोस्ट आवडली तर इतरांना नक्की share करा…व share मार्केआपले काही प्रश्न असतील तर आम्हाला विचारण्यास विसरू नका..

तर मग वाचक मित्रांनो आपणांस हा लेख कसा वाटला ते आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा…

Leave a Comment