SBI Mutual Fund: पैशाने मालामाल करणारे फंड! सरकारी बँकेच्या ‘या’ SIP योजनेतून मिळेल 9 पटीने परतावा!

SBI mutual fund SBI Mutual Fund: पैशाने मालामाल करणारे फंड! सरकारी बँकेच्या 'या' SIP योजनेतून मिळेल 9 पटीने परतावा!

एसबीआय स्मॉल कॅप फंड SBI Small Cap Fund

याचा 10 वर्षाचा परतावा:- 25% CAGR

एसबीआय स्मॉल कॅप फंड ही SBI Mutual Fund ची गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक परतावा देणारी योजना आहे. याने 10 वर्षात 25% CAGR परतावा दिला आहे. येथे, 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक 10 वर्षांत 9 लाख रुपये झाली आहे. तर, ज्यांनी या काळात 5,000 रुपयांची मासिक SIP केली त्यांना 22.5 लाख रुपयांचा निधी मिळाला.

गुंतवणूकदार या योजनेत किमान रु 5000 एकरकमी आणि रु 500 SIP गुंतवू शकतात. 31 जानेवारी 2022 रोजी फंडाची एकूण मालमत्ता 11,288 कोटी रुपये होती, तर 31 डिसेंबर 2021 रोजी खर्चाचे प्रमाण 1.73% होते.

एसबीआय टेक अपॉर्च्युनिटीज फंड SBI Tech Opportunities Fund

याचा 10 वर्षाचा परतावा:- 20% CAGR

एसबीआय टेक अपॉर्च्युनिटीज फंडमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक 10 वर्षांत 6.35 लाख रुपये झाली आहे.या कालावधीत तुम्ही SIP (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) द्वारे दरमहा रु 5,000 ची गुंतवणूक केली असती तर तुम्हाला 20 लाख रुपयांचा निधी मिळाला असता.या योजनेत तुम्ही एकरकमी म्हणून किमान रु 5,000 आणि SIP द्वारे दरमहा रु 500 ची गुंतवणूक करू शकता.31 जानेवारी 2022 पर्यंत, फंडाची एकूण मालमत्ता 2313 कोटी रुपये होती आणि 31 डिसेंबर 2021 पर्यंत खर्चाचे प्रमाण 2.23 % होते.

एसबीआय मॅग्नम मिडकॅप फंड SBI Magnum Midcap Fund

याचा 10 वर्षाचा परतावा:- 20% CAGR

SBI मॅग्नम मिडकॅप फंड योजना देखील गुंतवणूकदारांसाठी परतावा देणारे साधन आहे. फंडाने 10 वर्षात 20% CAGR परतावा दिला आहे. येथे, 1 लाख रुपयांची गुंतवणूक 10 वर्षांत 6.16 लाख रुपये झाली आहे. तर, जर तुम्ही या कालावधीत SIP द्वारे दरमहा रु 5,000 ची गुंतवणूक केली असती तर तुम्हाला रु. 16.5 लाख निधी मिळाला असता.या योजनेत तुम्ही एकरकमी म्हणून किमान रु 5,000 आणि SIP द्वारे दरमहा रु 500 ची गुंतवणूक करू शकता.31 जानेवारी 2022 पर्यंत, SBI Mutual Fund ची एकूण मालमत्ता 6859 कोटी रुपये होती आणि 31डिसेंबर 2021 पर्यंत खर्चाचे प्रमाण 1.94% होते.

एसबीआय फोकस्ड इक्विटी फंड SBI Focused Equity Fund

याने गुंतवणूकदारांना 10 वर्षात 18% CAGR परतावा दिला आहे.

येथे, 1 लाख रुपयांची गुंतवणूक 10 वर्षांत 5.28 लाख रुपये झाली आहे. तर, जर तुम्ही या कालावधीत SIP द्वारे दरमहा रु 5,000 ची गुंतवणूक केली असती तर तुम्हाला रु. 15.5 लाख निधी मिळाला असता.या योजनेत तुम्ही एकरकमी म्हणून किमान रु 5,000 आणि SIP द्वारे दरमहा रु 500 ची गुंतवणूक करू शकता.31 जानेवारी 2022 पर्यंत, फंडाची एकूण मालमत्ता 23,186 कोटी रुपये होती आणि 31 डिसेंबर 2021 पर्यंत खर्चाचे प्रमाण 1.92% होते

एसबीआय कन्झम्पशन अपॉर्च्युनिटीज फंड SBI Consumption Opportunities Fund

10 वर्षांचा परतावा :17.87% CAGR परतावा

मागील 10 वर्षात एसबीआय म्युच्युअल फंडाच्या टॉप परफॉर्मिंग फंडांमध्ये आहे.मागील 10 वर्षात या फंडाने सरासरी 17.87% सीएजीआर परतावा दिला आहे.जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या फंडात ₹1 लाख गुंतवले असतात, तर आज तुमच्याकडे ₹5.18 लाख झाले असतीत.जर तुम्ही मासिक ₹5000 ची SIP केली असती तर, 10 वर्षात तुमचा ₹14 लाख रुपयांचा फंड जमा झाला असता.या योजनेची वैशिष्ट्येकिमान ₹5000 ची एकरकमी गुंतवणूक किंवा ₹500 ची मासिक SIP करता येते.महत्वाची माहिती31जानेवारी 2022 पर्यंत फंडाची एकूण मालमत्ता ₹892 कोटी रुपये होती.31 डिसेंबर 2021 पर्यंत खर्चाचे प्रमाण 2.44 टक्के होते.

आमच्या इतर व्यवसाय कल्पना ब्लॉग पोस्ट वाचण्या करिता येथे क्लिक करा

Leave a Comment