SBI loan for PM Surya Ghar Muft Bijli Yojana:PM सूर्य घर “मोफत वीज “योजना SBI कर्जाद्वारे तुमचं स्वप्न पूर्ण करा!

SBI loan for PM Surya Ghar Muft Bijli Yojana: वाचक मित्रांनो काय आपणास ‘मोफत वीज’ हवी आहे का? जर आपले उत्तर ‘होय’ असेल तर आपल्याकरिता ही आनंदाची बातमी आहे.आता मिळवा केंद्र सरकारतर्फे दरमहा 300 युनिट पर्यंतची वीज मोफत…

होय विश्वास बसत नाही ना तुमचा पण हे एकदम खरं आहे….

अलीकडेच केंद्र सरकार ने (PM Surya Ghar Muft Bijali Yojana) पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना सुरु केली आहे…या योजने अंतर्गत आता नागरिकांना दरमहा तीनशे वीज युनिटचा मोफत वीजेचा लाभ मिळणार आहे…

SBI loan for PM Surya Ghar Muft Bijli Yojana
SBI loan for PM Surya Ghar Muft Bijli Yojana

फक्त या मध्ये अट एकच आहे कि अर्जदाराचे स्वतःचे छताचे घर असावे व घरावर सोलार पॅनल बसविण्याकरिता पुरेशी जागा असावी…या करिता केंद्र सरकार सबसिडी देखील देत आहे परंतु त्या पूर्वी अर्जदाराने छतावर सोलार रूफ टॉप बसविणे आवश्यक आहे…..

सोलर रुफटॉप बसवण्यासाठी लाखों रुपयाचा खर्च येतो किलोवॅटनुसार तो खर्च ठरत असतो  आणि त्यानुसारच सरकारकडून अनुदान मिळतं. या योजनेत किमान 30,000 रुपये अनुदान मिळत असलं तरीही, तुम्हाला खिशातून मोठी रक्कम खर्च करावी लागू शकते. पण काळजी करू नका, कारण या योजनेसाठी बँकेकडून Loan कर्जही उपलब्ध आहे.

सरकारच्या (PM Surya Ghar Muft Bijali Yojana) पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेचा लाभ घ्यायचा आहे पण खिशात पैसे नाहीत? काळजी करू नका ! 

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक, SBI आहे तुमच्या मदतीला आहे.(SBI loan for PM Surya Ghar Muft Bijli Yojana)

SBI बँकेने या योजनेसाठी खास कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या घरावर सोलर रुफटॉप बसवण्यासाठी कर्ज घेऊ शकता.

कर्ज कोणाला मिळेल आणि व्याजदर काय असेल? चला तर मग जाणून घेऊया !

3 KW क्षमतेचं सोलर रुफटॉप बसवण्यासाठी तुम्ही 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. या कर्जाचा व्याज दर वार्षिक 7 टक्के आहे.

3 KW पेक्षा जास्त आणि 10 KW पर्यंत क्षमतेसाठी तुम्ही 6 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. या कर्जाचा व्याज दर वार्षिक 10.15% असेल.

65 ते 70 वर्षे वयोगटातील लोकही हे कर्ज घेऊ शकतात. या योजनेत कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही.

3 KW क्षमतेचं सोलर रुफटॉप बसवण्यासाठी तुम्हाला तुमच्या उत्पन्नाची चिंता करण्याची गरज नाही. पण, 3 KW पेक्षा जास्त आणि 10 KW पर्यंत क्षमतेसाठी तुम्हाला कर्ज हवं असेल तर तुमचं निव्वळ वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे.

भारतातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक चांगली बातमी आहे. पीएम सूर्य घर योजना नावाची नवीन योजना सुरू होत आहे ज्यामुळे या कुटुंबांना घरात सोलर पॅनल बसवण्यासाठी आर्थिक मदत मिळेल. दुर्गम भागात राहणाऱ्या आणि ज्या राज्यात वीज महाग आहे अशा लोकांना या योजनेचा विशेष लाभ मिळेल.

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे(SBI loan for PM Surya Ghar Muft Bijli Yojana) या योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना वीजबिलाच्या खर्चात मोठी बचत होईल. त्याचबरोबर, पर्यावरणाचे रक्षण करण्यातही मदत होईल.

पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे

1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या:

  • www.pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवर तुम्हाला “अर्ज करा” बटन दिसेल.
  • “अर्ज करा” बटनावर क्लिक करा.

2. अर्ज फॉर्म भरा:

  • अर्ज फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, आधार क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागेल.
  • तुम्हाला तुमच्या घराचे फोटो आणि वीजबिल अपलोड करावे लागतील.

3. अर्ज जमा करा:

  • सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला “अर्ज जमा करा” बटनावर क्लिक करावे लागेल.
  • तुमचा अर्ज यशस्वीरित्या जमा झाल्यावर तुम्हाला एक पावती मिळेल.

अधिक माहितीसाठी तुम्ही www.pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा 1800-123-4567 या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करू शकता.

PM Surya Ghar Yojana Official WebsiteHome Page

आणखी इतर झटपट लोन च्या माहिती करिता आमचा हा पुढील लेख नक्की वाचा…

FAQs

पंतप्रधान सूर्य घर योजना कधी जाहीर करण्यात आली?

2 जानेवारी 2024 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सूर्य घर योजना जाहीर केली होती.

पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज कधी सुरू होतील?

पीएम सूर्य घर योजनेसाठी 13 फेब्रुवारी 2024 पासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

2 thoughts on “SBI loan for PM Surya Ghar Muft Bijli Yojana:PM सूर्य घर “मोफत वीज “योजना SBI कर्जाद्वारे तुमचं स्वप्न पूर्ण करा!”

Leave a Comment