Mutual Funds Information In Marathi_म्युचल फंड म्हणजे नक्की काय ?

आजकाल टीव्ही ads व तसेच अनेक लोकांच्या तोंडून तुम्ही Mutual Funds बद्दल नक्कीच ऐकले असेलच आणि तुमच्या मनात पण हा प्रश्न आला असेलच की म्यूचल फंड काय आहे ? ते कसे काम करते ? म्हणून 
या पोस्टच्या माध्यमातून मी तुमच्या मनात असलेल्या 
सर्व शंका दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे 
चला तर मग सुरुवात करूया.. 
 

 

Mutual Funds Information In Marathi
Mutual Funds Information In Marathi

 

Table of Contents

मुच्युअल फंड काय आहे ?

 

 म्यूचल फंड हा अनेक लोकांच्या पैशांनी बनलेला फंड आहे.म्यूचल फंड मध्ये लावलेला पैसा त्या कंपनी द्वारे वेगवेगळ्या जागी गुंतवला (invest) जातो आणि गुंतवणूकदाराला त्याच्या रकमेतून जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. कोणत्याही म्यूचल फंडला सांभाळण्याचे काम व्यवस्थापक proffesional fund manager करतात.यांचे काम विशिष्ट फंडची देखरेख करून फांडच्या पैशाला योग्य ठिकाणी गुंतवणूक invest करणे असते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर याचे काम लोकांच्या पैशाला गुंतवून जास्तीत जास्त नफा मिळवणे असते. म्युचल फंड चा पैसा हा फक्त कोणत्याही एकाच ठिकाणी न गुंतवता वेग वेगळ्या कंपन्या मध्ये गुंतवला जाता. ज्यामुळे पैसा गमावण्याची शक्यता कमीच असते. कारण जर गुंतवणूक केलेल्या कोणत्याही एका कंपनी ला नुकसान झाले तरीही बाकीच्या कंपन्या त्या काळात नफा मिळवीत राहतात व त्यामुळे जास्तीचे नुकसान होण्याचा धोका टळतो.

मुच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी कराल ?

आजच्या इंटरनेट युगात घरबसल्या म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. अनेक अँड्रॉइडअँप तसेच वेबसाइट्स च्या माध्यमाने आपण म्युचल फंड मध्ये आपले पैसे गुंतवू शकतात. 
 

 

काही प्रसिद्ध मुच्युअल फंड एप पुढील प्रमाणे आहेत..

 

 • myCAMS Mutual Fund App 
 
 • KuVera
 
 • Groww
 
 • Coin by Zerodha
 
 • Paytm Money
 
 • KFinKart Investor Mutual Funds
 
 
 • CashRich Mutual Fund App India
 
 • Axis Mutual Fund
 
 • SBI Mutual Fund – InvesTap
 
 • Jupiter Money
 
 • Kotak Mutual Fund
 
पण मी तुम्हाला म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी Groww ॲप वापरण्याची सल्ला देईल. 
कारण या ॲपमध्ये तुम्हाला कोणतेही अतिरिक्त चार्ज 
लागत नाहीत. हे अँप त्यांच्या ग्राहकांकडून कमिशन न मिळवता डायरेक्ट म्युचल फंड मधून कमिशन काढते.
 
पुढील लिंक वरून आपण Groww app  डाऊनलोड करू शकतात. अँप download केल्यानंतर त्यात अकाउंट उघडून खूपच सोप्या पद्धतीने म्युचल फंड विकत घेतात
 
 

मुच्युअल फंड मधील गुंतवणुकीच्या पद्धती 

 
गुंतवणूकदार हा म्युचल फंड मध्ये दोन पद्धतींद्वारे पैसे गुंतवू शकतो. यात पहिला आहे लंप सम आणि दुसरे आहे SIP अर्थात
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (Systematic investment Plan).
 
 
 

लंप सम Lum Sum  

 

लंप सम गुंतवणूक प्रकारात गुंतवणूकदारांकडून एकादाच मोठी रकम गुंतवली जाते. व पुन्हा पुन्हा गुंतवणूकदार त्यात पैसे टाकीत नाही.
 
जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात पैसा पडलेला असेल व तुम्ही त्याला योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असतात तर लंप सम म्युचल फंड प्रकारात तुम्ही त्याला गुंतवू शकतात.
 
 

सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेन्ट प्लॅन  

 
एस आय पि ला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हटले जाते. या प्रकारात गुंतवणूकदार नियमितपणे ठराविक रक्कम म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतो. गुंतवणुकीचा हा कालावधी प्रती आठवडा, प्रतिमहिना किंवा दर चार महिन्यात असू शकतो.
 
SIP हा प्रकार त्यांच्यासाठी असतो जे लोक नोकरी वैगरे करीत आहेत, व ज्यांचा पगार प्रती माह मिळतो. असे लोक गुंतवणूक म्हणून दर महिन्याला आपल्या पगारातून काही पैसे बाजूला ठेवून म्युचल फंड मध्ये गुंतवू शकतात.
 

 

मुच्युअल फंड चे प्रकार 

 
वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी असतात. हे मुख्यत्वे तीन प्रकारचे असतात.
 

1.इक्विटी किंवा ग्रोथ फंड्स-Equity or Growth Funds

 
– हे प्रामुख्याने इक्विटीज मध्ये म्हणजेच कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात.
 
– यांचे प्राथमिक उद्दिष्ट संपत्ती निर्माण करणे किंवा भांडवलाचे अधिमूल्यन करणे हे असते.
 
– त्यांच्यामध्ये मोठे परतावे मिळवण्याची क्षमता असते आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ते सर्वोत्तम असतात.
 
– याची उदाहरणे म्हणजे
 
 • “लार्ज कॅप” फंड्स जे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात ज्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुस्थापित असतो.

 

 • “मिड कॅप” फंड्स जे मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.

 

 • “स्मॉल कॅप” फंड्स हे लहान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.

 

 • “मल्टी कॅप” फंड्स जे मोठ्या, मध्यम आणि लहान अशा मिश्र कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.

 

 • “सेक्टर” फंड्स हे एकाच प्रकारचा व्यवसाय असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.                       
 • उदा.तंत्रज्ञान फंड्स हे तंत्रज्ञान विषयक कंपन्यांमध्येच गुंतवणूक करतात. 

 

 • “थेमॅटिक” फंड्स जे एका सामाईक थीम मध्येच गुंतवणूक करतात.                                                         
 • उदा. इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स जे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात ज्यांना पायाभूत सुविधा विभागाच्या गुंतवणुकीतून लाभ होतो.


          – टॅक्स सेविंग फंडस्

 

2. इन्कम किंवा बाँड किंवा फिक्स्ड इन्कम फंड्स

 
– जे फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज, जसे की, सरकारी सिक्युरिटीज किंवा बाँड्स, कमर्शियल पेपर्स आणि डिबेंचर्स, बँक सर्टिफिकेट्स किंवा डीपॉझीट्स आणि ट्रेजरी बिल्स, कमर्शियल पेपर्स सारखी मनी मार्केट इन्स्ट्रुमेन्ट्स इ. मध्ये गुंतवणूक करतात.
 
– ह्या तुलनेने सुरक्षित गुंतवणुक आहेत आणि या उत्पन्न निर्मितीसाठी सोयीस्कर आहेत.
 
– याची उदाहरणे म्हणजे लिक्विड, कमी कालावधी, बदलता दर, कॉर्पोरेट डेब्ट, डायनॅमिक बाँड, गिल्ट फंड्स इ.
 
 

3. हायब्रीड फंड्स

 
-हे इक्विटी आणि फिक्स्ड इन्कम दोन्ही प्रकारच्या फंड्स मध्ये गुंतवणूक करतात, 
 
त्यामुळे ते दोन्हींमधले सर्वोत्तम म्हणजेच विकासाची क्षमता आणि त्याचबरोबर उत्पन्न निर्मिती दोन्ही देतात. 
 
– उदा. अग्रेसीव्ह बॅलन्स्ड फंड्स, कॉन्झर्व्हेटिव्ह बॅलन्स्ड फंड्स, पेन्शन फंड्स, 
   चाईल्ड प्लॅन्स आणि मासिक उत्पन्न योजना इ.
 
 
तर मंडळी ही होती Mutual Funds मध्ये गुंतवणूक करण्याबद्दलची माहिती. मला आशा आहे की या लेखाला वाचल्यानंतर तुमच्या Mutual funds basics शंका दूर झाल्या असतील. 
 
 
 
या लेखात तुम्हाला Mutual funds marathi mahiti दिली आहे. ज्या मुळे 
Mutual Funds basic information
तुम्हाला मिळाली असेल. जर म्युचल फंड संबंधी तुमच्या अजुनही काही शंका असतील तर खाली कमेंट करून तुम्ही आम्हाला विचारू शकतात..
 
 

तरी महत्तवाचं म्हणजे :

 
  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

1 thought on “Mutual Funds Information In Marathi_म्युचल फंड म्हणजे नक्की काय ?”

Leave a Comment