Mutual Fund In Marathi|आपल्या गुंतवणुकीचं नशीब उज्ज्वल करणारा ‘म्युचुअल फंड म्हणजे काय आहे’? आणि तो कसा फायदा करून देतो?

Table of Contents

‘म्युचुअल फंड म्हणजे काय आहे’?

परंतु हा आपल्या ‘गुंतवणूकीचं नशीब उज्ज्वल करणारा’ म्युच्युअल फंड नेमका काय आहे? आणि तो आपला कसा फायदा आपल्याला करून देतो? याची माहिती आपण या ब्लॉग पोस्ट मध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात..!

What is Mutual Fund? And its Benefits| Mutual Fund in Marathi

वाचक मित्रांनो, म्युच्युअल फंड हा Share market मधील गुंतवणूकीचा एक वेगळा असा प्रकार आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार एकत्र येतात आणि आपले पैसे ते Share, Bonds, equity आणि इतर मालमत्ते मध्ये गुंतवितात. हे पैसे त्या क्षेत्रातले Expert असे फंड मॅनेजर एकत्रितपणे गुंतवतात

फंड मॅनेजर चे एकच ध्येय असते आणि ते म्हणजे आपल्या इन्व्हेस्टर्सना जास्तीत जास्त नफा मिळवून देणे

 • आपण आणि आपल्या सारखे अनेक इन्व्हेस्टर्स हे पैसे एकत्र करतात …
 • आणि हे ‘फंड मॅनेजर’ नावाच्या व्यक्ती कडे आपण देतोत…
 • हे एक्स्पर्ट फंड मॅनेजर हे आपले पैसे नावाजलेल्या चांगल्या कंपन्या मध्ये हे पैसे इन्व्हेस्ट करतात…
 • आणि कालांतराने आपल्याला आपल्या गुंतवणूकीवर हमखास चांगला परतावा मिळवून देतात….

Mutual Fund Investment Benifits?

Mutual Fund In Marathi
Source source Freepik.com

वाचक मित्रांनो भारतात Stock Market मध्ये सरासरी सात हजार पेक्षा जास्त कंपन्या listed आहेत आणि त्यातील चांगल्या कंपन्या निवडणं हे आपल्या सारख्या नव शिख्यानं करीता फारच जोखीमचं असं काम आहे आणि त्यात भरपूर अशी रिस्क ही आहे.आणि कधी कधी म्यूचुअल फंड गुंतवणुकीत पैसे सुरक्षित आहेत का? अशी शंका ही आपणांस वाटू शकते कारण त्या करिता आपल्या कडे Share Market चे उत्तम ज्ञानही उपलब्ध नसते अशा बिकट परस्थिती मध्ये Mutual Fund हे आपल्या साठी योग्य असा पर्याय ठरतो ….

कारण या  म्युच्युअल फंडातून मिळणाऱ्या पैशांचा वापर हा विविध प्रकारच्या टॉप लिस्टेड Nifty 50 कंपन्यामध्ये इन्व्हेस्ट करण्या करिता आपण करू शकतो…

उदाहरण द्यायचे झाले तर :

इत्यादी….

जर समजा आपण इन्व्हेस्ट केलेल्या एखाद्या कंपनीचे शेअर्स हे एखाद्या वेळेस खराब कामगिरी करत असतील तर इतर चांगल्या कामगिरी करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्स मुळे आपला तोटा हा नक्कीच भरून जाऊ शकतो…Mutual Fund in Marathi|

Professional Managment for Mutual fund
Image Source Freepik.com

म्युच्युअल फंड हे फायनान्स क्षेत्रातील एक्स्पर्ट चालवतात त्यांना “फंड मॅनेजर”असे म्हणतात हे फंड मॅनेजर हे कोणत्याही कंपनीचे शेअर निवडण्यापूर्वी त्या कंपनीचा सखोल असा अभ्यास करतात.

सामान्यतः गुंतवणूकदार व एक्स्पर्ट फंड मॅनेजर यात खूप फरक आहे हे कसे आपण पाहुयात 

एक्स्पर्ट फंड मॅनेजरकडे अर्थव्यवस्था, बाजारपेठ व  वेगवेगळ्या उद्योगांमध्ये काम केल्याचा अनेक वर्षांचा उत्तम अनुभव आणि ज्ञान असते.

एक्स्पर्ट फंड मॅनेजर्सकडे  वेगवेगळ्या कंपन्यांचा सखोल अभ्यास आणि विश्लेषण करण्यासाठी आवश्यक साधने आणि संसाधने असतात.

एक्स्पर्ट फंड मॅनेजर हे पूर्णवेळ आपल्या गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करीत असल्याने त्यांचे काम नक्कीच चांगल्या प्रकारे होते.

 • चांगली निवड: फंड मॅनेजर आपल्याला  चांगल्या कंपन्यांचे शेअर निवडून देतात ज्यामुळे चांगला परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते.
 • आपल्या वेळेची बचत होते :आपल्याला स्वतः संशोधन करण्याची आणि वेळ घालवण्याची गरज बिलकुलच  नाही.
 • विविधता: फंड मॅनेजर आपल्यासाठी विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात ज्यामुळे आपली  जोखीम कमी होते.
 • व्यावसायिकता: आपण आपले पैसे हे अनुभवी आणि कुशल व्यावसायिकांच्या हातात देत आहोत याचे समाधान आपल्याला होते.
mutual fund in marathi
Image source freepik.com

म्युचुअल फंडमधून पैसे काढणं खूप सोपं आहे! म्युचुअल फंडमध्ये “Liquidity” खूप जास्त प्रमाणात असते  , याचा अर्थ तुम्ही तुमच्या गुंतवणुकी मधून  (Asset) म्हणजे लवकर पैसे काढू शकता.

 • दररोज म्युचुअल फंडची “नेट एसेट व्हॅल्यू” ज्याला (NAV) म्हणतात ती निश्चित केली जाते.
 • तुम्ही NAV च्या किंमतीनुसार फंडात गुंतवणूक करू शकता किंवा पैसे काढू शकता.
 • अचानक पैशांची गरज भासल्यास तुम्ही त्वरित पैसे काढू शकता.
 • अगोदर म्युचुअल फंडामधून पैसे काढण्या करिता  T + 3 दिवस लागायचे.
 • याचा अर्थ T (तुम्ही जेव्हा पैसे काढता त्या दिवसा) ला पैसे काढले तर ते तुमच्या बँक खात्यात 3 दिवसांनंतर जमा होत असत.
 • आता T + 2 मध्ये पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतात.
 • लवकरच ते T + 1 मध्ये जमा होतील.
 • T = तुम्ही पैसे काढता ते दिवस
 • 2 किंवा 3 दिवस = तुमचे पैसे बँक खात्यात जमा होण्यासाठी लागणारा वेळ
mutual fund in marathi
best for small investors
image source freepik.com

आपण नुकतेच नोकरीवर लागला आहात आणि आपल्या पहिल्या पगारापासून तुम्हाला ₹500 गुंतवायचे आहेत. तुम्ही काय कराल?

जर तुम्ही एकटे शेअर खरेदी करण्याचा विचार केला तर:

 • तुम्ही कदाचित फक्त एकच Share खरेदी करू शकाल.
 • तुम्हाला  जास्त Share खरेदी करायचे असल्यास तुम्हाला लहान कंपन्यांचे शेअर खरेदी करावे लागतील, जे अधिक जोखीमयुक्त असू शकतात.

परंतु ,म्युचुअल फंडा सोबत असे होणार नाही :

 • तुम्ही ₹500 ची SIP सुरू करू शकता आणि हे पैसे विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवले जातील.
 • याचा अर्थ तुम्ही थोड्या पैशातही विविधीकरण मिळवू शकता आणि जोखीम कमी करू शकता.

थोडक्यात:

 • म्युचुअल फंड हे छोट्या गुंतवणूकदारांसाठी उत्तम आहेत कारण ते तुम्हाला थोड्या पैशातही विविधीकरण मिळवण्याची आणि जोखीम कमी करण्याची सुविधा देतात.
 • तुम्ही ₹500 इतक्या कमी रकमेनेही SIP सुरू करू शकता.

भारतामध्ये म्युच्युअल फंडांवर SEBI (Securities and Exchange Board of India.)

mutual fund in marathi 
SEBI Image for information purpose
Image source by SEBI official website

Mutual Fund in Marathi|:सेबी (प्रतिभूती आणि विनिमय मंडळ) आणि एएमएफआई AMFI (असेट मॅनेजमेंट कंपनीज ऑफ इंडिया) या दोन मुख्य नियामक संस्थांचे नियंत्रण आहे.

SBEI हे भारतातील वित्तीय बाजारपेठेचे नियामक म्हणून काम करते आणि त्याची जबाबदारी म्युच्युअल फंड योजना आणि त्यांचे व्यवस्थापक यांचे नियमन करणे हे आहे. SBEI  हे सुनिश्चित करते की म्युच्युअल फंड योजना गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करतात का? आणि त्या कायद्यानुसार चालवल्या जातात का?.

AMFI  ही एक स्वायत्त संस्था आहे जी म्युच्युअल फंड उद्योगाच्या विकासासाठी मुख्यतः जबाबदार आहे. 

AMFI Mutual Fund योजना ही व्यवस्थापकांसाठी मानके आणि मार्गदर्शक तत्त्वे विकसित करते. ती इन्व्हेस्टर्सचे शिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम देखील आयोजित करत राहते.

म्युच्युअल फंडांवर विशेष देखरेख ठेवण्यासाठी SBEI आणि AMFI यांना अनेक विशेष अधिकार आहेत. यात पुढील गोष्टींचा समावेश होतो :

 1. म्युच्युअल फंड योजनांची नोंदणी करणे आणि त्यांना मंजूरी देणे
 2. म्युच्युअल फंड व्यवस्थापकांचे नियमन आणि देखरेख करणे
 3. गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करणे
 4. शेअर बाजारातील गैरव्यवहार आणि फसवणूक रोखणे
 5. इन्व्हेस्टर्सचे शिक्षण आणि त्यांना नेहमी जागरूक ठेवण्या करीता जागरूकता कार्यक्रम आयोजित करत राहणे 
 6. भारतात म्युच्युअल फंड उद्योग हा एक मोठा आणि वाढता उद्योग आहे. SEBI आणि AMFI यांच्या विशेष नियंत्रणाखाली, Mutual Fund हे भारतातील इन्व्हेस्टर्स साठी एक सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणुकीचा पर्याय बनले आहे.
Mutual fund in marathi
Invesment in mutual fund

Mutual Fund in Marathi|:आजच्या या ऑनलाइन काळात  म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणं खूप सोपं झाले आहे. अगदी कमी कागदपत्रांच्या आधारे आपण टॉप listed कंपन्यांच्या फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.

 1. म्युच्युअल फंड मध्ये पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यां करिता केव्हायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करणे  गरजेचे  आहे. ही प्रक्रिया फक्त एकदाच आपल्याला करावी लागेल 
 2. आपण  वितरका कडून, गुंतवणूक सल्लागार यांच्याकडून किंवा Online  E-KYC द्वारे केवायसी पूर्ण करू शकता.
 3. KYC ही Mutual Fund गुंतवणुकीची चावी आहे. एकदा आपली KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपण कोणत्याही म्युचुअल फंडामध्ये  गुंतवणूक करू शकता, या करिता परत परत  तपासणी करण्याची काही गरज भासत नाही.

KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही म्युच्युअल फंड वितरक, नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार, स्टॉकब्रोकर, बँक किंवा इतर आर्थिक मध्यस्थांद्वारे गुंतवणूक करू शकता.

 • तुम्ही स्वतः फंड हाउसच्या कार्यालयात जाऊन किंवा त्यांच्या वेबसाईटवरून ऑनलाइन गुंतवणूक करू शकता किंवा इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता.
 1. ऑफलाइन पद्धतीने थेट गुंतवणूक करायची की वितरकाच्या मदतीने हे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे.
 2. समजा जर आपल्याला  स्वतःची गुंतवणूक व्यवस्थापित करायची असेल तर तुम्ही ऑनलाइन फंडच्या official वेबसाईटवरून किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून अगदी सुरक्षितपणे गुंतवणूक करू शकता.
 3. तुम्हाला गुंतवणुकीसाठी काही सल्ला हवा असल्यास किंवा मदत हवी असल्यास तुम्ही वितरक, गुंतवणूक सल्लागार, बँक इत्यादीं पर्याया चा वापर करू शकता.
 1. आधार कार्ड
 2. मतदार ओळखपत्र
 3. ड्रायव्हिंग लायसन्स
 4. पासपोर्ट
 5. PAN Card (सर्व प्रकरणांमध्ये आवश्यक)

2. पत्ता पुरावा (Address Proof):

 1. आधार कार्ड
 2. मतदार ओळखपत्र
 3. ड्रायव्हिंग लायसन्स
 4. पासपोर्ट
 5. बँकेचे विधान
 6. वीज बिल
 7. टेलिफोन बिल
 8. नगरपालिका कर रसीद

3. आर्थिक पुरावा (Financial Proof):

 1. Bank Statment 
 2. वेतनपत्रक (जर नोकरीत असाल तर)

4. फोटो (Photograph):

 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 1. जर तुम्ही NRI म्हणजे विदेशी नागरिक असाल तर तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसाची कॉपी जमा करावी लागेल.
 2. नावात बदल झालेला असल्यास, तुम्हाला विवाह प्रमाणपत्र किंवा नावाचा बदल करणारा कायदेशीर दस्तऐवज जमा करावा लागेल.
 3. जर तुम्ही संयुक्त खाते उघडत असाल तर सर्व सहखातेदारांनी वरील सर्व कागदपत्रे जमा करावीत.
 • वरील यादीमध्ये काही बदल होऊ शकतो .म्युच्युअल फंड कंपनीनुसार आवश्यक कागदपत्रांमध्ये थोडा फरक असू शकतो हे लक्षात घ्या .

सहसा Mutual Funds हे  त्या कंपनीच्या NAV (Net Asset Value) प्रकारच्या किंमतीला खरेदी केले जातात.

Mutual Fund in Marathi|

NAV म्हणजे म्युच्युअल फंडाच्या एका युनिटची एकूण मालमत्ता मोजून त्याचे शेअर बाजारातील  किंमतीने विभाजन करून काढलेली किंमत असते .

 1. म्युच्युअल फंडाकडे विविध  कंपन्यांचे (शेअर्स) शेअर असतात.
 2. या सर्व शेअर्सची एकूण बाजारपेठेतील किंमत काढली जाते.
 3. म्युच्युअल फंडाकडे असलेली एकूण रोख रक्कम यात जोडली जाते.
 4. या एकूण रकमेचे म्युच्युअल फंडातील युनिट्सच्या संख्येने विभाजन केले जाते.
 5. मिळणारी रक्कम म्हणजे त्या युनिटची NAV होईल.
उदाहरणार्थ :
 1. समजा म्युच्युअल फंडाकडे 100 रुपये किंमतीचे 100 शेअर्स आहेत .
 2. याचा अर्थ 10,000 रुपये किंमतीची एकूण मालमत्ता.
 3. म्युच्युअल फंडाकडे 5,000 रुपये रोख रक्कम आहे.
 4. एकूण मालमत्ता (10,000) + रोख रक्कम (5,000) = 15,000 रुपये.
 5. म्युच्युअल फंडातील युनिट्सची संख्या 1000 आहे.
 6. NAV = 15,000 / 1000 = 15 रुपये प्रति युनिट.
 1. NAV ही दिवसभरात बदलू शकणारी गतिमान किंमत आहे.
 2. आपण  सकाळी 10 वाजता खरेदी केलेला NAV दुपारी 2 वाजता वेगळा असू शकतो. 
 3. तुम्ही म्युच्युअल फंड युनिट ऑनलाइन, म्युच्युअल फंड कंपनीच्या शाखा किंवा वितरकाद्वारे खरेदी करू शकता.
 4. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी, तुमचे गुंतवणुकीचे ध्येय निश्चित करा,गुंतवणुकीचा कालावधी आणि जोखीम सहनशीलता यांचा विचार करा.
 5. विविध प्रकारचे म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत, त्यामुळे तुमच्या गरजेनुसार योग्य फंड निवडा.
 6. गुंतवणुकीतून मिळणारे Returns हे सदैव निश्चित नसतात हे नेहमी लक्षात असू दया .
mutual fund in marathi
how to choose best mutual fund
Image source freepik.com

वाचक मित्रांनो सर्वात चांगला Mutual Fund in Marathi म्युच्युअल फंड निवडत असताना काही गोष्टी ह्या लक्षात घ्याव्या लागतील ज्यामध्ये आपली वैयक्तिक आर्थिक उद्दिष्टे, आपली जोखीम घेण्याची शक्ती ह्या गुंतवणुकीच्या क्षितिजावर अवलंबून असतात त्यामुळे तरी सुद्धा आपणांस योग्य असे मार्गदर्शन मिळावे म्हणून आम्ही पुढील काही टिपा देत आहोत 

आपण Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्या पूर्वी आपली गुंतवणूक ही Long Term करिता करणार की Short Term करिता नियमित उत्पन्न मिळविण्या करिता करणार हे अगोदर निश्चित करा ज्या मुळे आपल्याला योग्य प्रकारचा म्युच्युअल फंड निवडण्यास मदत होईल.

आपण या गुंतवणुकीत जास्तीत जास्त किती लॉस घेऊ शकता या करिता आपले माइंड सेट म्हणजेच आपली मानसिकता तयार करा कारण ह्या मध्ये चांगले रिटर्न्स सोबतच नुकसान पण होऊ शकतो त्या करिता आपली जोखीम सहनशक्ती समजून घेणे आपल्याला आपल्यासाठी योग्य असलेला म्युच्युअल फंड निवडण्यास नक्कीच  मदत करेल.

आपण किती काळासाठी गुंतवणूक करण्यास तयार आहात? हे आपण एकदा का ठरविले त्यावरुन आपल्यासाठी योग्य असलेला म्युच्युअल फंड निवडण्यास नक्कीच  मदत मिळू शकेल..  

इक्विटी म्युच्युअल फंड, डेप्त  म्युच्युअल फंड, हायब्रीड म्युच्युअल फंड आणि मनी मार्केट फंड असे अनेक वेगवेगळया  प्रकारचे म्युच्युअल फंड शेअर बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टे, जोखीम सहनशक्ती आणि गुंतवणुकीच्या क्षितिजानुसार योग्य प्रकारचा म्युच्युअल फंड निवडा.

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड .तपासणे महत्वाचे आहे, मागील काही वर्षांमध्ये त्या फंड ने कशी कामगिरी केली आहे ते पहा व त्या वरूनच निर्णय घ्या.

प्रत्येक म्युच्युअल फंड एक Management शुल्क आणि इतर खर्च घेतो. हे खर्च आपल्याला मिळणाऱ्या रिटर्न्स वर  परिणाम करतील. म्हणून, शक्यतो कमी खर्च असलेला फंड निवडा.

म्युच्युअल फंड एका फंड मॅनेजरद्वारे व्यवस्थापित केला जातो. त्याचा अनुभव आणि ट्रॅक रेकॉर्ड तपासा.

म्युच्युअल फंड कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो ते पहा. तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांशी सुसंगत असलेले पोर्टफोलिओ असलेला फंड निवडा.

तुम्हाला खात्री नसल्यास, तुम्ही वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता. ते तुमच्या गरजेनुसार योग्य म्युच्युअल फंड निवडण्यात तुम्हाला मदत करू शकतात.

तर मग वाचक मित्रांनो हा Mutual Fund in Marathi लेख आपणांस कसा वाटला व या लेखातून आपणांस म्युच्युअल फंड बद्दल सविस्तर अशी माहिती मिळाली अशी अपेक्षा मी करतो तरी देखील आपल्या या लेखा बद्दल काही शंका असतील तर आम्हाला कळवा व आमचा लेख आपणास आवडला  असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा…

Leave a Comment