Minor Trading & Demat on Zerodha in Marathi|आपल्या लहान मुलांचे ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट झिरोधावर सुरु करा 

Minor Trading & Demat on Zerodha in Marathi: नुकताच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने लहान मुलांकरिता डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट ओपन करण्याची परवानगी दिली आहे.

ज्याप्रमाणे एखाद्या मुला मुलींचे Minor Bank A/c मायनर बँक अकाऊंट असते व त्याचे पालक अकाऊंट चालवतात त्याच प्रमाणे हे  डिमॅट / ट्रेडिंग अकाऊंट त्याचे आई बाबा चालवू शकतील.किंवा त्यांच्या सहमतीने इतर कोणी स्टॉक मार्केट जाणकार अपॉईंट करून तो हे अकाऊंट वापरू शकेल.

आणि त्याच दृष्टीकोनातून स्टॉक मार्केटची नावाजलेली कंपनी Zerodha ने सर्वप्रथम ही सुविधा लहान मुलांना दिली आहे त्यामुळेच लहानपणा पासूनच मुलांना पैसे हे योग्य ठिकाणी invest गुंतवणूक करून त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये त्याचा फायदा व्हावा व पैशांचे महत्त्व लहानपणीच त्यांना कळावे….

Minor Trading & Demat on Zerodha साठी लागणारी महत्वाची डॉक्युमेंट्स

आपल्या लहान मुलांचे Minor Trading & Demat account on Zerodha मध्ये काढण्याकरिता आपल्याला खालील महत्वाची कागदपत्रे लागतील …

आपल्या मुलाचे / मुलीचे PAN कार्ड आपल्याला तयार करून घ्यावे लागेल…

आपल्या मुलाचे / मुलीचे आधार कार्ड

जन्म तारखेचा पुरावा म्हणून जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला / टी सी, बोनाफाईड

आपल्या मुलाचे/मुलीचे बँकेची  canceled cheque ची कॉपी  किंवा बँकेचे स्टेटमेंट जोडावे लागेल

पालकांचे PAN कार्ड सोबत जोडावे लागेल

पालकांचा पत्ता ऍड्रेस (प्रूफ म्हणून पासपोर्ट किंवा ड्रायविंग लायसेंस किंवा वोटर ID चालेल

 पालकांची  स्वाक्षरी/सही

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या Guide line नुसार (Minor) मुलांच्या पालकांचे अगोदरच डिमॅट अकाऊंट active असले पाहिजे व ते ब्लॉक किंवा सस्पेंड नसावे….

त्याच बरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस लहान मुलांच्या अकाऊंट मधून शेअर विकत घेतले जातील किंवा शेअर विकले जातील त्या शेअर चे पैसे हे त्याच मुलाच्या Minor अकाऊंट मध्ये जातील….

त्यामुळे शेअर खरेदी करताना व विकताना काळजीपूर्वक व्यवहार करावा लागेल

चला तर मग पाहुयात मुलांचे स्टॉक ट्रेडिंग करिता डिमॅट अकाउंट झिरोधा zerodha मध्ये कसे उघडता येईल त्याची प्रोसेस कशी आहे…..

मुलांचे स्टॉक ट्रेडिंग करिता डिमॅट अकाउंट Zerodha झिरोधा मध्ये कसे उघडता येईल 

Minor Trading & Demat on Zerodha

अगोदर Zerodha.com या website वर लॉग इन करा आणि पालकांच्या Zerodha अकाऊंट डीटेलने कंटिन्यू करा.

पालकांच्या अकाऊंटने लॉग इन केल्यानंतर मोबाइल नंबर टाकून कंटिन्यू करा.

OTP येईल तो टाकून कंटिन्यू करा

ईमेल ID टाका

ईमेलवर OTP येईल तो टाकून कंटिन्यू करा.

लहान मुलाच PAN नंबर आणि जन्म तारीख टाका. DigiLocker सोबत KYC पूर्ण करा

कंटिन्यू करून लहान मुलाच आधार नंबर टाकून कंटिन्यू करा.

मोबाइलवर एक OTP येईल तो टाकून सबमिट करा.

Digilocker  चा security पिन टाका.

पुढे पालकांची संपूर्ण माहिती देऊन कंटिन्यू करा.

पुढे लहान मुलाच्या बँक अकाऊंटची डिटेल्स द्या आणि IPV (in person verification) साठी कंटिन्यू करा.

IPV करून झाल्यावर डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि कंटिन्यू करा

e-sign using the Aadhaar वर क्लिक करा आणि पालकाची  e-sign ची प्रोसेस पूर्ण करा.

पालकांच्या आधार नंबर टाका. मोबाइल नंबरवर एक OTP येईल ते Verify करून e-sign प्रोसेस पूर्ण करा.

शेवटी Application सबमिट करा. सबमिट केल्यानंतर पालकांच्या ईमेल ID वर मायनरच्या Demat अकाऊंट लॉग इन डिटेल्स पाठवले जातील.

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या Guide line नुसार (Minor) मुलांच्या पालकांचे अगोदरच डिमॅट अकाऊंट active असले पाहिजे व ते ब्लॉक किंवा सस्पेंड नसावे….

त्याच बरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस लहान मुलांच्या अकाऊंट मधून शेअर विकत घेतले जातील किंवा शेअर विकले जातील त्या शेअर चे पैसे हे त्याच मुलाच्या Minor अकाऊंट मध्ये जातील….

त्यामुळे शेअर खरेदी करताना व विकताना काळजीपूर्वक व्यवहार करावा लागेल

FAQs

Minor Trading & Demat on Zerodha

अल्पवयीन मुलांसाठी कोणते डिमॅट खाते सर्वोत्तम आहे ?

  1. झेरोधा मायनर डिमॅट खाते: हे खाते 18 वर्षांखालील मुलांसाठी विनामूल्य आहे. यात कोणतेही वार्षिक देखभाल शुल्क किंवा डीमॅट खाते उघडण्याचे शुल्क नाही.
  2. अपस्टॉक्स मायनर डिमॅट खाते: हे खाते 18 वर्षांखालील मुलांसाठी ₹99 प्रति वर्ष शुल्क आकारते. यात डीमॅट खाते उघडण्याचे शुल्क ₹200 आहे.
  3. एंजल ब्रोकिंग मायनर डिमॅट खाते: हे खाते 18 वर्षांखालील मुलांसाठी ₹499 प्रति वर्ष शुल्क आकारते. यात डीमॅट खाते उघडण्याचे शुल्क ₹300 आहे.

अल्पवयीन डिमॅट खात्यासाठी किमान वय किती आहे ?

अल्पवयीन डिमॅट खात्यासाठी किमान वय 18 वर्षे आहे. 18 वर्षांखालील मुलं स्वतःच्या नावावर डिमॅट खाते उघडू शकत नाहीत. पालक किंवा कायदेशीर पालकांनी मुलाच्या नावावर डिमॅट खाते उघडायचे असल्यास त्यांना जॉइंट डिमॅट खाते किंवा मायनर डिमॅट खाते उघडावे लागेल.

Leave a Comment