Investment Tips in Marathi |सर्वोत्तम गुंतवणूक कोणती? स्टॉकस,एफडी,का सोने?

स्टॉक मार्केट मधील गुंतवणूक 

Investments Tips in Marathi

निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड म्हणजे काय? Investment Tips in Marathi

निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड हे एक प्रकारचे म्युच्युअल फंड आहे जे विशिष्ट मार्केट इंडेक्सचा मागवा घेते.

उदाहरणार्थ निफ्टी-50 इंडेक्स म्युच्युअल फंड निफ्टी फिफ्टी इंडेक्स मधील 50 सर्वात मोठ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूकदारांचे पैसे invest करते..

उदाहरणार्थ: रिलायन्स,एशियन पेंट्स,एल अँड टी विप्रो,आयसीआयसीआय, एसबीआय ,या अशा प्रकारच्या नावाजलेल्या मोठ्या कंपन्यांमध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक करते आता प्रश्न येतो की या…

हे पाहण्या अगोदर आपल्याला हे पहावे लागेल की निफ्टी हा जो एक इंडेक्स आहे हा 1996 सालापासून सुरू झालेला आहे 1996 ते 2024 हा एवढा मोठा जवळ जवळ 28 वर्षाचा कालावधी जर आपण निफ्टी 50 चा पाहिला तर निफ्टीने आपल्या गुंतुकदारांना किती परतावा दिला आहे हे आपण CAGR Calculator ने तपासून पाहूया….

CAGR Calculator for Investment Tips in Marathi
  1. निफ्टी ची इ.स. 1996 या वर्षी value होती जवळपास 1000 रू.
  2. आता सध्याची म्हणजे 2024 या चालू वर्षाची निफ्टी ची value आहे 23000 रू
  3. म्हणजेच मागील 28 वर्षामध्ये निफ्टीने आपल्या गुंतवणूक दारांना जवळपास 11.85 टक्के एवढा गुंतवणूक परतावा दिला आहे….

मग काय म्हणता वाचक मंडळींनो हा परतावा कमी आहे का? का जास्त आहे…?

अर्थातच जास्त आहे….

एफडी मध्ये किती परतावा मिळतो..?

साधारण: 7 ते 8% गुंतवणूक परतावा आपल्याला मिळतो…

सोन्यामध्ये किती परतावा मिळतो..?

सोन्यामध्ये जवळपास 8.9% परतावा गुंतवणूक दारांना  मिळाला आहे….

आता 11.85 % परतावा हा निफ्टीचा मिळाला पण हा झाला इतिहास….आता,

मागील 1996 साला पासून गुंतवणूक दारांना 11.85 % परतावा हा निफ्टीचा मिळाला हे आपण पाहिले परंतु, हे 11.85 टक्केच परतावा कायम आपणांस मिळणार का..?

तर याची खात्री कुणीच देऊ शकत नाही…परंतु आपण जर भविष्यात आशावादी राहून असा विचार केला तर…जे इंग्लिश मध्ये म्हणतात ना की,

Pesimestic (निराशावादी) आणि Optimistic (आशावादी) प्रमाणे निफ्टी फिफ्टी चे भविष्यात टार्गेट काय असू शकतील..?

आर्थिक जाणकारांच्या मते आपल्या भारत देशाची वाटचाल ही पुढील 2030 पर्यंत जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होण्याची आहे त्याच पद्धतीने आपण विचार केला तर मागील 11.85 टक्के पेक्षा ही जास्त परतावा आपणास निफ्टी 50 मध्ये मिळू शकतो का..?

ते आपण पुढील Lumsum FV Calculator ने तपासून पाहुयात…

Lumpsum FV Calculator  Investment Tips in Marathi
  1. Nifty 50 ची सध्याची म्हणजे 2024 या वर्षाची Value आहे 23000 रू
  2. मागील 28 वर्षात जेवढा परतावा मिळाला तेवढाच म्हणजे 11.85 टक्के परतावा जर आपण या ठिकाणी गृहीत धरला आणि
  3. 2030 साल म्हणजे पुढील 6 वर्षाचा कालावधी जर आपण निवडला तर आपणांस Future value मिळेल 45034 रू

म्हणजे याचा अर्थ आहे Nifty मार्केट 45 हजारांचा टप्पा मागील वर्षाच्या सरासरी प्रमाणे आपल्याला नक्की मिळेल…

परंतु परतावा जर आपण आशावादी राहून आणखी जास्त म्हणून जर आपण 14.5 टक्के प्रमाणे पुढील 6 वर्षा करिता पहिला तर तर हा परतावा 51827 रूपया पर्यन्त सुद्धा आपल्याला मिळू शकतो पहा ते कसे ..

Lumpsum FV Calculator  Investment Tips in Marathi

बघा हे खात्रीशीर नाही पण योग्य आर्थिक तज्ज्ञां ची राय घेऊन जर आपण आपले पैसे Nifty 50 मध्ये इन्वेस्ट केले व जोखिम पत्करली तर नक्कीच Nifty 50 मध्ये चांगले रिटर्न्स आपल्याला मिळू शकतील यात काही शंका नाही…..

दुसरा गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे ‘मुदत ठेव म्हणजे FD (Fixed Deposit) या मधील परतावा किती मिळतो ते आपण पाहुयात…..

एफ डी मधील गुंतवणूक परतावा 

Investments Tips in Marathi

वाचक मंडळींनो एफ डी मध्ये आपणास कोणत्याही nationalised म्हणजेच राष्ट्रीयकृत बँकेत SBI वगैरे यामध्ये जवळपास 6.50% ते 7 % हमखास परतावा मिळतो…

पण याचा अर्थ असा का की एफडी म्हणजे योग्य गुंतवणूक नाही…

नाही असेही आपणांस म्हणता येणार नाही कारण एफडी सुद्धा चांगला गुंतवणुकीचा पर्याय आहे पण तो कोणासाठी…?

तर तो अशा लोकां करिता आहे ज्यांना कुठल्याही प्रकारची जोखिम नको आहे अशा लोकांसाठी एफडी हा चांगला पर्याय नक्कीच आहे…

परंतु, FD मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवणे गरजेचे आहे की,

कोणत्याही बँकेत जास्तीत जास्त 5 लाखां पेक्षा जास्त रक्कम एफडी करू नका कारण जर समजा बँक बुडाली किंवा दिवाळखोरीत निघाली तर 5 लाखां पर्यंत विमा कव्हर Insurance असतो तो तुमच्या एफडी वर मिळतो त्याला DICGC म्हणजे Deposit Insurance and Credit Guarantee Corporation असे म्हणतात यांनी हा विमा गुंतवणूक दारांना दिलेला आहे आणि म्हणजेच जरी बँक बुडाली तरी आपणांस आपल्या पाच लाखाच्या एफडी वर 5 लाख हमखास मिळतील…

आणि दुसरी गोष्ट अशी की एफडी तुम्ही कधी करताय? व किती काळासाठी करताय? की तुम्हाला नक्की अमुक अमुक वर्षापर्यंत एवढे पैसे मिळावे म्हणून अशा बँकेत पैसे गुंतवू नका ज्या बँकेचे तुम्ही विशेष नावही ऐकलेली नाही शक्यतो तुम्ही नॅशनलाईज्ड किंवा नावाजलेल्या मोठ्या प्रायव्हेट सेक्टर बँकेमध्ये एफडी करण्यास हरकत नाही कारण ते बुडण्याची शक्यता कमी असते.

आता आपण वळूयात तिसऱ्या गुंतवणुकीकडे म्हणजेच त्यातल्या त्यात महिलांचा आवडता विषय म्हणजेच सोने खरेदी….

सोन्यामधील गुंतवणूक 

Investments Tips in Marathi

‘सोन’ म्हटलं की तुम्हाला प्रश्न पडला असेल की सोन्याने आज पर्यंत परतावा किती दिला आहे जसे निफ्टीने मागील 28 वर्षात 11.85% परतावा दिला आहे एफ डी मध्ये सरासरी साडे सहा ते सात टक्के परतावा मिळतो तसे सोन्याने मागील 1996 सालापासून आतापर्यंत नक्की किती परतावा दिला आहे हे जर आपण पाहिले तर सोन्याचे जवळपास 8.9% हा परतावा गुंतुक गुंतवणूकदारांना दिला आहे.

 म्हणजेच आता तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल की सोने हे एफडी च्या तुलनेत जास्त परतावा दिलेला आहे परंतु स्टॉक मार्केट मधील निफ्टी 50 ने सर्वात जास्त परतावा हा गुंतवणूकदारांना दिला आहे परंतु सोने हे आपल्या पोर्टफोलिओ मध्ये म्हणजेच जिथे जिथे आपण गुंतवणूक करणार आहोत तिथे सोने असावे की नसावे..?

 तर अनेक हुशार अभ्यासू जाणकारांच्या मते तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या किमान दहा टक्के तरी सोन्यामध्ये गुंतवणूक आपण करावी कारण बहुधा असे मानले जाते की स्टॉक्स आणि सोने हे छोट्या किंवा कमी कालावधीमध्ये विरुद्ध दिशेने जातात म्हणजेच जर स्टॉक्स बुलिश पद्धतीने वरच्या दिशेने वाढत राहिले तर सोनं पडतं आणि स्टॉक्स बेरिश पद्धतीने खाली आले तर सोन्याचे भाव वाढतात. याने तुमच्या पोर्टफोलिओ ला बॅलन्स मिळण्यास फायदा होतो 

तिसरी सोन्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपत्कालीन परिस्थिती येते म्हणजेच युद्ध नैसर्गिक आपत्ती भूकंप वगैरे अशी अनिश्चितता येते त्यावेळेला मोठे मोठे फंड मॅनेजर हे लोक सुद्धा इक्विटी,स्टॉक्स, बॉण्डमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा सोन्यामध्ये गुंतवणूक करतात कारण की सोने हे सगळ्यात सेफ मानले जाते व त्यावेळेस सोन्याला भाव जास्त येतो त्यामुळे जर सोन्यामध्ये गुंतवणूक करायचे असे ठरवले तर नेमके आपण कुठल्या प्रकारे सोन्यात गुंतवणुक करू शकतो..?

तर जिकडे सोन्याच्या दागिन्यांमध्ये मेकिंग चार्जेस एकदम कमी प्रमाणात असतात किंवा जवळजवळ शून्य असतात तीच खरी सोन्याची गुंतवणूक.. 

ही झाली फिजिकल गुंतवणूक आता जर तुम्हाला ऑनलाईन सोने घ्यायचे असेल तर एस जी बी मध्येही तुम्ही पैसे गुंतवू शकता परंतु तेही काही कालावधीमध्येच….

Conclusion 

परंतु प्रश्न असा आहे की स्टॉक्स, एफडी,सोने यापैकी सर्वोत्तम कोण असा प्रश्न तर कायमच आहे ना….!

वाचक मंडळींनो तर 

तिसरा क्रमांक आहे एफडी म्हणजे फिक्स डिपॉझिट चा 

दुसरा क्रमांक आहे गोल्ड म्हणजे सोन्याचा

आणि,

पहिला क्रमांक आहे शेअर्स म्हणजे स्टॉक्सचा..

परंतु हे आपण ठरवले कसे ?

आपण यावरून ठरवले की परतावा कोणाचा जास्त आहे यावरूनच ना…

परंतु यामध्ये जोखीम चा जर आपण विचार केला तर जोखीम ही सर्वात जास्त आहे स्टॉक्स म्हणजे शेअर मार्केटमध्ये…. 

त्याच्या खालोखाल कमी जोखीम आहे सोन्यामध्ये आणि सर्वात कमी जोखीम ही एफडी मध्ये आहे याच्यातून आपण काय शिकलो तर जेवढी जास्त जोखीम आपण घ्याल तेवढा जास्त परतावा आपणास मिळणार आहे तर मग तिघांमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण असे आपण म्हटले तर कोणीच नाही कारण ठरतं कसं सर्वोत्तम कोण? तर ते ठरतं तुमच्या ध्येयावर तुमचे नक्की ध्येय काय आहे त्याच्यावरती हे ठरतं आता तुमचे ध्येय असेल की मला एका वर्षात किंवा एका वर्षाच्या आत माझ्या मुलाची फीस भरायची आहे म्हणून मला एका वर्षात अमुक अमुक एव्हढी रक्कम हवी आहे अशा वेळेला एफडी हे सर्वोत्तम पर्याय आहे म्हणजेच कमी कालावधीच्या ध्येयाकरिता एफडी सर्वोत्तम गुंतवणूक आहे.

जर तुम्ही मिडीयम किंवा लॉंग टर्म कालावधी करिता परतावा मिळवू इच्छित असाल साधारणतः तीन ते पाच वर्षाकरिता जसे की मुला मुलींचे उच्च शिक्षण किंवा त्यांचे लग्न वगैरे त्याकरिता सोन व शेअर्स हे दोन्हीही चांगले पर्याय आहेत..

पण जेव्हा अनिश्चितता येते त्या वेळेला सोनं हे सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय ठरेल..

तर एकंदर काय आहे तर आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ‘फक्त सोन’,’फक्त शेअर्स’, किंवा ‘फक्त एफडी’ ठेवायची नाही तर तिघांचाही योग्य पद्धतीने समावेश आपल्या गुंतवणुकी मध्ये आपला असला पाहिजे आणि तुमच्या ध्येयाप्रमाणे तुमची जी काही गुंतवणूक असेल ती मॅच करून घेणं खूप गरजेचे आहे…

तरी महत्तवाचं म्हणजे

 तर मग वाचक बंधूंनो Investment Tips in Marathi हा लेख तुम्हाला वाचायला कसा वाटला .?

हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व तुमच्या प्रियजनांना हा लेख शेअर करायला विसरू नका व आपणांस या बद्दल काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा

धन्यवाद….

Leave a Comment