Credit card information in marathi क्रेडिट कार्ड बद्दल जाणून घ्या ह्या 5 महत्वाच्या गोष्टी..

मराठी वाचक कट्ट्या वरील वाचक मित्रांनो नमस्कार….
आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण credit card क्रेडिट कार्ड बद्दल 5 महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत..
चला तर सुरुवात करुयात या ब्लॉग पोस्ट ची…!


What is credit card? क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

Credit card information in marathi

वाचक बंधूंनो, Credit card information in Marathi
credit card म्हणजे हे प्रकारचे कर्ज आहे ते रोख स्वरूपामध्ये न मिळता ते क्रेडिट कार्डच्या स्वरूपात आपल्याला बँकेमार्फत पातळ प्लॅस्टिक कार्ड च्या स्वरूपात मिळते …
या credit card चा उपयोग पैशाप्रमाणे केला जाऊ शकतो आणि महिना अखेरीस खर्च केलेली रक्कम ही आपल्याला व्याजासहित बँकेला परत करावे लागते..
आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ऑनलाईन बँकिंग व ऑनलाईन खरेदी करिता क्रेडिट कार्ड चा वापर नागरिक खूप मोठ्या प्रमाणात करीत आहेत…
अशा वेळी या credit card चा वापर नक्की कुठे व कसा करावा, याची माहिती प्रत्येक नागरिकांना व कार्ड धारकांना असणे ही काळाची गरज आहे…
चला तर मग पाहूया याचा वापर आपण कुठे व कसा करू शकतोत…..

Credit card चा वापर कोठे व कसा करावा..?

use of credit card

वाचक मित्रांनो,Credit card information in Marathi

Credit card बद्दल सांगत असताना या द्वारे अनेक सेवा आपल्याला घेता येतात …
या कार्ड द्वारे बँकेतील आपल्या जमा रकमेपेक्षा जास्त रक्कम आपल्याला वापरता येते.
व ती रक्कम वापरल्यानंतर त्यावरील व्याज हे निश्चित कालावधी मध्ये बँकेला परत करावे लागते
याचा वापर आपण ऑनलाईन शॉपिंग करिता करू शकतोत,

त्याच बरोबर ATM मधून रोख रक्कम काढण्या करिता ही करू शकतो..

एखादी गरजेची वस्तू खरेदी करण्याकरिता या मध्ये ईएमआय हा पर्याय सुद्धा उपलब्ध असतो.
Credit card द्वारे बँकेतून कर्ज घेऊन ते आपण दिलेल्या नियमित वेळेत बँकेला परत केल्यास कोणत्याही प्रकारची थकबाकी नाही असे जर बँकेला वाटले तर तुम्ही एक चांगले ग्राहक आहात आणि तुम्ही बँकेची थकबाकी करणार नाहीत या आधारावर बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड ची limit आणखी वाढवून देते, व यामुळे तुमचा ऑनलाईन क्रेडिट स्कोर ही आपोआप वाढण्यास मदत होते….

Credit card information in marathi

Credit card चे प्रकार कोणते आहेत..?

वाचक मित्रांनो,Credit card information in Marathi
बहुतेक क्रेडिट कार्ड एक किंवा दोन मुख्य श्रेणींवर केंद्रित असतात, जे क्रेडिट कार्डचा प्रकार परिभाषित करतात. काही सर्वात सामान्य क्रेडिट कार्ड प्रकार खाली सूचीबद्ध आहेत.Credit card च्या प्रकारामध्ये ,

सिल्व्हर क्रेडिट कार्ड

Credit card information in Marathi

सिल्व्हर क्रेडिट कार्डमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कमाल मूल्य व परतफेडीची सुविधा मिळते. यामध्ये प्रकारा मध्ये Advance कॅश काढण्याची मर्यादा ९० टक्के पर्यन्त मिळते

गोल्ड क्रेडिट कार्ड

गोल्ड क्रेडिट कार्ड  हे जगभरात स्वीकारले जाते.
या गोल्ड क्रेडिट कार्डला ग्लोबल एटीएम नेटवर्क मिळते म्हणजेच तुम्ही हे कार्ड जागतिक स्तरावर वापरू शकता. याशिवाय जगभरातील रिटेल, डायनिंग आणि एंटरटेनमेंट आउटलेट वर या गोल्ड क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही शॉपिंग मध्ये अनेक प्रकारच्या सूट मिळवू शकता.

प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

प्लॅटिनम कार्ड तुम्हाला रोख व्यवहार ते जागतिक एटीएम नेटवर्क च्या सुविधा ह्या मध्ये मिळतात. याशिवाय तुम्हाला वैद्यकीय आणि कायदेशीर संदर्भ आणि मदत मिळते. तसेच, हे कार्ड वापरून तुम्ही शेकडो डील, डिस्काउंट ऑफर आणि इतर सुविधा मिळवू शकता.

महिलांकरिता क्रेडिट कार्ड

महिलांना आत्मनिर्भर बनविणे हा या कार्ड चा उद्देश आहे. महिलांना क्रेडिट कार्डवर 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळू शकते. या कर्जावर १४.९९ टक्के ते १५.९९ टक्के व्याज दर असतो. तसेच, तसेच जास्तीत जास्त 60 महिन्यांसाठी महिला ह्या कर्जाची परतफेड करू शकतात. हे कर्ज फार कमी कागदपत्रांसह मिळू शकते.या कार्ड च्या मदतीने महिलांना अमेझॉन वर ऑनलाईन शॉपिंग करिता 500 रुपयाचे गिफ्ट मिळते…

ऑटो फ्यूअल इंधन क्रेडिट कार्ड

ऑटो फ्यूअल इंधन क्रेडिट कार्ड विविध प्रकारचे फायदे देतात ज्यामुळे ग्राहकांचा इंधन खर्च प्रभावीपणे कमी होतो. काही कार्ड हे इंधन खरेदी करता तेव्हा प्रत्येक वेळी कॅश बॅक ऑफर देतात, तर काही रिवार्ड ऑफर करतात जे मोफत इंधन, गिफ्ट व्हाउचर, ट्रॅव्हल rewards कॅश बॅक आणि बरेच काही मिळवण्यासाठी कॅश आउट केले जाऊ शकतात. साधारणतः इंधन भरल्यानंतर या मध्ये ग्राहकांना 1% ते 2.50% पर्यंत सुट मिळते…

यात्रा क्रेडिट कार्ड

नावाप्रमाणेच हे कार्ड प्रवाशांना त्यांच्या प्रवासात भरपूर फायदे देते. प्रवासा व्यतिरिक्त, हे कार्ड शॉपिंग आणि मनोरंजन संबंधित खर्चावर देखील भरपूर फायदे देते. हे क्रेडिट कार्ड जागतिक स्तरावर 2 कोटी आउटलेट आणि भारतात 3,25,000 आउटलेट मध्ये स्वीकारले जाते.

आयआरसीटीसी क्रेडिट कार्ड

IRCTC च्या सहकार्याने लाँच केलेले, IRCTC क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना खूप कमी वार्षिक शुल्कामध्ये प्रवासी फायदे देतात. इतर खरेदीवरील बक्षिसांसह, हे कार्ड IRCTC द्वारे रेल्वे तिकीट बुकिंग मध्ये 10 टक्के पर्यन्त सूट मिळते .त्यामुळे रेल्वे तिकीट बुकिंग मध्ये या क्रेडिट कार्ड चा याचा खूप मोठा फायदा मिळतो.

ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड

ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड हे प्रवाशी लोकांकरीता खूप फायदेशीर आहे या मध्ये विमानांच्या तिकीट बुकिंग मध्ये भव्य discount मिळते व प्रवासा मध्ये हॉटेल बुकिंग असो किंवा रेस्टॉरंट खर्च या ट्रॅव्हल कार्ड मुळे वापरकर्त्याला याचा पुरेपूर फायदा मिळतो…

क्लासिक क्रेडिट कार्ड

क्लासिक क्रेडिट कार्ड हे मुख्यत्वे क्रेडिट स्कोअर तयार करण्यासाठी त्याच बरोबर

आपत्कालीन खरेदी करण्यासाठी आणि पेमेंट संरक्षणासाठी क्लासिक क्रेडिट कार्ड चा वापर करता येतो

एलआयसी च्या क्लासिक क्रेडिट कार्ड सुविधे मध्ये पांच लाख पर्यन्त चा विमा कव्हर मिळतो

टायटॅनियम क्रेडिट कार्ड.

टायटॅनियम कार्ड हा क्रेडिट कार्डचा एक प्रकार ज्यामध्ये प्लॅटिनम कार्डांपेक्षा जास्त क्रेडिट मर्यादा असते आणि सामान्यतः चांगला क्रेडिट स्कोअर आणि जास्त उत्पन्न असलेल्या लोकांनाच हे कार्ड ऑफर केले जाते.या मध्ये क्रेडिट लिमिट ही अमर्याद असते व याचा व्याज दर ही इतर क्रेडिट कार्ड च्या तुलनेने जास्त असतो परंतु याचा वापर जगात कुठेही करता येतो..मोठे बिझनेसमन ज्यांचे उत्पन्न हे करोडो मध्ये आहे अशा लोकांनाच याचा वापर करता येतो..

असे प्रकार आहेत….

Credit card चे फायदे काय आहेत..?

Credit card information in Marathi

 1. क्रेडिट कार्ड मुळे आपल्याकडे पैसे नसतानादेखील आपण वस्तू खरेदी करू शकतो.
 2. Credit card द्वारे बँकेतून ऑनलाईन वस्तू खरेदी करता येते.
 3. Credit card द्वारे विविध प्रकरचे बिल भरणे, विविध तिकीट काढणे,LIC व इतर हप्ते भरणे इत्यादी सहजपणे करता येते.
 4. आपल्याला रोख रक्कम जवळ बाळगण्याची आवश्यकता नाही.
 5. Credit card द्वारे एखादी वस्तू कर्ज स्वरूपामध्ये खरेदी करता येते.
 6. Credit card च्या नियमित वापरामुळे त्याची नोंद होते आणि बँक व इतर कंपन्यांकडून (ज्यांच्याकडून खरेदी केली ते) क्रेडिट कार्ड धारकाला बक्षिस म्हणून काही गुण किंवा सवलती देतात. त्याचा वापर करून एखादी वस्तू कमी किमतीत घेता येते.

Credit card चे तोटे काय आहेत..?

Credit card information in Marathi

क्रेडिट कार्ड वापरताना रोख रक्कम भरणा करावी लागत नसल्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त खरेदी केली जाते. ज्यामुळे बील भरण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण होते.
क्रेडिट कार्डचा भरणा वेळेत केला नाही, तर खर्च केलेल्या रकमेवर अनावश्यक व्याज (दंड) भरावा लागतो.
Online व्यवहारात क्रेडिट कार्डच्या नावाने ग्राहकांची फसवणूक वाढताना दिसून येत आहे.
Online खरेदीमुळे क्रेडिट कार्ड वरून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यामुळे घरातील मासिक आर्थिक व्यवस्थापन कोलमडत असते.
क्रेडिट कार्डचा वापर कोठे आणि कसा करावा, हे ग्राहकाला माहिती नसल्यामुळे त्याचा आर्थिक फटका त्याला बसतो.

Credit card चा वापर करीत असताना कोणती काळजी घ्यावी?

Credit card information in Marathi

 • प्रत्येक महिन्याला आपल्याला क्रेडिट कार्ड च्या बिलाकरिता संपूर्ण रक्कम आपण बँकेत भरावी जेणेकरून आपणास दंडाचा आर्थिक भुर्दंड बसणार नाही…जर पूर्ण रक्कम आपण भरली नाहीतर उरलेल्या रकमेवर आपणास तीन ते चार टक्के दराने व्याज बँकेला द्यावा लागतो….
 • Credit card द्वारे मिळणारी रक्कम ही 45 दिवसां पर्यंत बिनव्याजी असते, मात्र आपली पूर्वीची थकबाकी ही झिरो आहे का हे तपासूनच पुढील रक्कम आपण क्रेडिट कार्ड ने घ्यावी
 • शक्यतो क्रेडिट कार्ड मर्यादेच्या च्या 50 टक्के पेक्षा जास्त रक्कम आपण खर्च करू नये….
 • Credit card वर मिळणारी रक्कम ही आपल्याला आपला सिव्हील स्कोअर तपासून मिळते त्यामुळे क्रेडिट कार्ड हे आपण मर्यादित स्वरूपातच वापरावे त्यामुळे आपला क्रेडिट स्कोर कमी होणार नाही..
 • शक्यतो क्रेडिट कार्ड ने रोख रक्कम काढणे टाळावे, कारण रोख रकमेवर व्याज शुल्क जास्त भरावा लागतो….
 • Crdit card च्या बिलाचा भरणा दिलेल्या मुदतीत वेळेवर भरावा नाहीतर दिवसागणिक व्याज वाढत जाते..
 • सध्या ऑनलाईन फसवेगिरी खूप प्रमाणात वाढली आहे त्यामुळे Credit card चा ऑनलाईन वापर करीत असताना सावधगिरीने व विचारपूर्वक करावा.
 • आपल्या उत्पन्नापेक्षा कमी मर्यादा असणारे क्रेडिट कार्ड घ्यावे
 • सुरुवातीला क्रेडिट कार्डद्वारे फक्त १०० रुपयांचा व्यवहार करून बिलाची वाट पाहावी. यामुळे बिलाची तारीख माहित होईल.
 • जास्त क्रेडिट दिवस मिळविण्यासाठी १५ तारखेनंतर क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार कारवा. असे केल्यास बिलाची पुढील महिन्यातील ३० दिवस मिळत असल्यामुळे ग्राहकाला सुमारे ४० ते ४५ दिवस क्रेडिट मिळेल.
 • सायबर कॅफेवर कधीही क्रेडिट कार्डचा वापर करू नये.
 • credit card बद्दल ची कोणतीही माहिती कोणासही सांगू नये,
 • उदा., OTP आणि पासवर्ड.
 • कार्ड हरवल्यास ते कार्ड त्वरित बंद करून घ्यावे.
 • कोणत्याही कारणास्तव कार्ड बंद करताना आपल्यावरील थकबाकी असलेली रक्कम नील (शून्य) करूनच ते बंद करावे. अन्यथा ते कार्ड कार्यरत असल्याचे गणले जाऊन त्याचे बिल वाढत जाते. उदा., जर कार्ड धारकावर ५० पैसे बाकी असताना त्याने कार्ड बंद केल्यास त्यास एक वर्षानंतर सुमारे २-३ हजार रुपये बिल येऊ शकते.
 • कार्ड घेताना कमी व्याजदर असलेल्या बँके कडूनच credit card घ्यावे…
 • Credit Card चे फायदे काय आहेत ?

Credit Card मुळे ऑनलाईन बँकिंग,ऑनलाईन खरेदी,ऑनलाईन बिले देणे हे सर्व कामे सहज व सोप्या पद्धतीने करता येतात व हे सर्व कर्जाच्या माध्यमातून असल्याने आपणास 50 दिवसांचा कालावधी मिळतो.

 • Credit Card वापरणे चांगले की वाईट ?

Credit Card हे एक आजीवन-मुक्त क्रेडिट कार्ड आहे जे क्रेडिटसाठी नवीन असलेल्या आणि त्यांच्या खरेदीवर रिवॉर्ड पॉइंट मिळवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी सर्वात योग्य आहे .

मग वाचक मंडळीनो…

हा credit card information in Marathi

लेख तुम्हाला आवडला असेल.जर तुम्हाला हा लेख 

आवडला असेल तर कृपया शक्य तितका शेअर करा.

या लेखात आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे 

असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला कमेन्ट किंवा ईमेल लिहून सांगू शकता.

धन्यवाद !!

Leave a Comment