Bussiness Ideas 2024 बाजार मार्केट मध्ये आहे याची जबरदस्त मागणी, सुरू करा हा लाखांचे उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय..

बाजार मार्केट मध्ये आहे याची जबरदस्त डिमांड,फक्त 5 रू प्रती किलो मध्ये तयार होतो आणि विकतो 15 रू. प्रती किलो दराने….

नमस्कार वाचक मित्रांनो,
आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आम्ही आपणास एकदम कमीत कमी गुंतवणुकी मध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या bussiness-ideas-2024 व्यवसाया बद्दल माहिती देणार आहोत आणि विशेष म्हणजे या करिता आपणांस सरकार कडून अनुदान ही मिळू शकते;

तर मग कोणता आहे हा व्यवसाय चला तर मग पाहुयात त्या करिता आमची ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचा…!

सामान्यतः शेतातील पीक काढणी नंतरचा कचरा निरुपयोगी मानला जातो आणि तो फेकून दिला जातो किंवा तो जाळला जातो.

जे हवा प्रदूषित करून पर्यावरणास दूषित करतो परंतु जर योग्य तंत्रज्ञानाच्या मदतीने जर या कचऱ्याचे मौल्यवान इंधनात रूपांतर करता आले तर ..?

अगदी याच विषयाची कल्पना आज आम्ही या पोस्ट मध्ये मांडून “टाकाऊ पासून टिकवू” करून याच शेतातील कचऱ्याचे मौल्यवान इंधनात रूपांतर करणार आहोत..


मार्केट मध्ये एक नवीन मशीन आली आहे जिचे नाव आहे Biomass Briquetting Machine बायोमास ब्रिकेटिंग मशीन..

जे कोळशाच्या जागी वापरता येण्याजोग्या कृषी घटकांना (Agriculture west) ऊर्जावान असे इंधन तयार करते. यामुळे गावातील उद्योजकांना या कृषि कचऱ्यापासून कमाई करण्याची उत्तम संधी मिळते आणि पर्यावरणालाही याचा फायदा होतो.

Bussiness Ideas 2024 मध्ये बायोमास ब्रिकेटिंग मशीन कसे कार्य करते?

Biomass Briquetting machine Bussiness Ideas 2024 बाजार मार्केट मध्ये आहे याची जबरदस्त मागणी, सुरू करा हा लाखांचे उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय..

बायोमास ब्रिकेटिंग मशीन या यंत्रामध्ये मोठ्या स्क्रूसारख्या पात्याचा वापर करून यामध्ये शेतातील west materials म्हणजे कचरा टाकला जातो जिथे एक गरम घटक (600 अंश सेल्सिअस) मध्ये फिरतो आणि त्यास दाब देऊन संकुचित करतो. उष्णतेमुळे कचऱ्यामध्ये लिग्नोसेल्युलोज नावाचा चिकट पदार्थ हा चिकटवण्याचे काम करून यंत्राच्या दाबामुळे या कचऱ्याचे इंधन विटांमध्ये रूपांतर होते, या विटां धूर निर्माण न करता बराच काळ जळत राहणाऱ्या असतात व कोळश्या प्रमाणेच या काम करतात.

आणि एक व्यक्ती सहजपणे ही मशीन ऑपरेट करू शकते या व्यवसाया करिता दहा ते पंधरा कामगारांची आवश्यकता लागते या मशिन करिता जास्त जागेची आवश्यकता भासत नाही, फक्त 30-35 चौरस फूट जागा यास पुरशी आहे.

या बायोमास ब्रिकेटिंग मशीनला चालवण्याकरिता 10 KW वीजेची गरज भासेल , 30 HP ची मोटर असल्याने गावा मध्ये किंवा शहरां मध्ये सहजपणे ब्रिकेटिंग युनिट्स उभारू शकतो .

Raw Materials / कच्चा माल कसा बनवला जातो?

शेतातील टाकाऊ कचरा हा मशीन मध्ये टाकण्या पूर्वी कचऱ्या सोबत 8 ते 12 टक्के पाणी योग्य प्रमाणात
टाकले जाते बायोमास ब्रिकेटिंग युनिटमध्ये बसवलेले रोटरी ड्रायर गरम हवेसह कचरा वाळवतो. शेणासारखा खूप ओला कचरा डिवॉटरिंग मशीनमध्ये अर्धवट वाळवला जातो. सर्वोत्तम परिणामां साठी कचऱ्याचे तुकडे 3 ते 6 मिलिमीटर दरम्यान असावेत.अशा रीतीने त्या मशीन मध्ये कचरा टाकून त्याचे रूपांतर इंधन विटांमध्ये होते..

bussiness-ideas-2024


भरपूर प्रमाणात उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय

आपल्या ग्रामीण भागा मध्ये तांदूळ लागवडीतील शिल्लक राहिलेला कचरा किंवा भुसा, त्यानंतर ऊस तोडणी नंतरचा शिल्लक राहिलेला पाला पाचोळा, आणि इतर भुईमुगाच्या शेंगाचे टरफल, बदाम,आखरोट यांचे शिल्लक राहिलेले टरफल आणि त्याच बरोबर लाकूड किंवा शेणखत हे अगदी कमी किमतीत किंवा पुरेशा प्रमाणात मिळते त्यामुळे हा व्यवसाय जर ग्रामीण भागात सुरू केला तर या व्यवसायात अधिक उत्पन्न मिळू शकते..

बायोमास ब्रिकेटिंग मशीन चालवण्याचा खर्चही त्या प्रमाणात कमी आहे इंधन विटा बनवण्यात सरासरी प्रती किलो 5 रु खर्च अपेक्षित आहे जर समजा तुम्ही या इंधन विटा प्रति किलो 15 रुपये दरानेही याची विक्री केली तरीही तुम्हाला प्रतिकिलो 10 रुपये हमखास नफा मिळेल. सरासरी ब्रिकेटिंग मशीन ही , दर तासाला 300-500 किलो इंधन वीट तयार करू शकते, त्यामुळे सरासरी वार्षिक 50 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा या व्यवसाया मध्ये मिळू शकतो…

यावरून हे स्पष्ट होते की शेतातील कचरा हा ब्रिकेटिंग मशीनच्या साह्याने जर याचे इंधन मध्ये परिवर्तन केले तर ग्रामीण भागातील लोकां करिता हा व्यवसाय नक्कीच फायदेशीर व्यवसाय म्हणून या कडे आपणांस बघता येईल …

आमच्या इतर प्रकारच्या Bussiness ideas चे लेख वाचण्या करिता ह्या लिंक वर click करा

कचऱ्यापासून इंधन बनवून कमवा पैसे आणि करा पर्यावरण स्वच्छ..

शेतातील तोडणी नंतर उरलेल्या कचऱ्यापासून बनवलेल्या या इंधन विटा थेट कोळशाच्या जागी याचा वापर होत असल्याने मोठे कारखाने, किंवा इतर वीट भट्टी, किंवा इतर अन्न उत्पादन क्षेत्रा मध्ये या वापरल्या जाऊ शकतात. या इंधन विटा कोळशापेक्षा जास्त काळ जळतात आणि त्या कोळशापेक्षा जास्त उष्णता देतात आणि सर्वोत्तम म्हणजे या इंधन विटा तो धूर सोडत नाही! यामुळे हवा स्वच्छ राहते, खाणीतून कोळसा खोदण्याचे प्रमाण कमी होते आणि जमीनही
सुरक्षित राहते. शेतकरी स्वत:चा कचरा वापरु शकतात, कोळसा खरेदी करण्याची गरज नाही. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्याने गळणाऱ्या कचऱ्यापासून कमी मिथेन वायू बाहेर पडतो. इंधनाच्या उत्पादनासाठी नवीन पिके घेण्याची आवश्यकत नसल्यामुळे, हे एक शाश्वत इंधन चक्र आहे.

यामध्ये सरकारची भूमिका

कचऱ्यापासून इंधन विटा तयार करणे हा फायदेशीर आणि पर्यावरण स्नेही असा व्यवसाय आहे तो देशभरात अंगीकारण्यासाठी सुरुवातीला सरकारचे सहकार्य आवश्यक आहे. यंत्रांवर अनुदान किंवा इंधनावरील किमान आधारभूत किंमत यासारखी धोरणे याला नक्कीच प्रोत्साहन देतील. बॉयलर राख किंवा पिकांच्या अवशेषांपासून इंधन तयार करण्यासाठी राज्य वीज मंडळे थर्मल पॉवर स्टेशनजवळ छोटे कारखाने सुरू करू शकतात. शहरांमधील ओला कचरा वेगळा करून तो इंधन निर्मिती करणाऱ्या ठिकाणी नेल्यास कचरा व्यवस्थापनात मदत होईल.

जर योग्य हाताळणी केली आणि या करिता सरकारी अनुदान मिळविण्या करिता जर योग्य असे पाऊल आपण उचलले तर नक्कीच या मध्ये आपणांस सरकारचे सहकार्य नक्कीच आपणांस मिळू शकेल व या व्यवसाया मध्ये आपणांस भरघोस असे उत्पन्न मिळेल..

चला तर मग bussiness-ideas-2024 या व्यवसायात उतरून यश संपादन करूया व आपले तसेच आपल्या परिवाराचे हित आणि त्याच बरोबर आपल्या पर्यावरणाचे ही त हित आपण जोपासूया ….

Leave a Comment