Bharti Hexacom (Airtel) IPO:गुंतवणूक करण्या अगोदर हे नक्की वाचा

नमस्कार वाचक मित्रांनो,

तुम्ही कोणत्या मोबाइल कंपनीचा सिमकार्ड वापरता? नक्कीच जिओ वापरत असाल परंतु जिओ येण्या अगोदर एअरटेल चे सिमकार्ड तुम्ही नक्कीच वापरले असेल? असे मी समजतो.

जर तुम्ही एअरटेल वापरले असेल तर तुम्हाला आता आनंद होईल कारण या कंपनीचा नवीन IPO येत आहे.

पण थोडं थांबा! हा IPO ‘एअरटेल’ नावाने नाही तर ‘भारती हेक्साकॉम’ (Bharti Hexacom) या नावाने स्टॉक मार्केट मध्ये येत आहे.

हे का?

कारण ‘भारती हेक्साकॉम’ हे कंपनीचं रजिस्टर नाव आहे आणि ‘एअरटेल’ हे त्यांच्या बिझनेसचं नाव आहे.त्यामुळेगोंधळून जाऊ नका !

आता तुम्हाला समजलं असेल की ‘भारती हेक्साकॉम’ आणि ‘एअरटेल’ हे एकच आहेत.तर मग काय?आता Bharti Hexacom (Airtel) IPO:गुंतवणूक करावी की नाही?असा प्रश्न आपणांस पडला असेल तर गुंतवणूक करण्यापूर्वी या कंपनीची माहिती नीटपणे माहीत असणे आपणांस गरजेचे आहे त्यामुळे चला थोडीशी माहिती पाहुयात या आयपीओ बद्दल….

Table of Contents

Bharti Hexacom Airtel IPO
 • आयपीओ सुरु होईल: 14 एप्रिल 2024
 • आयपीओ बंद होईल: 5 एप्रिल 2024
 • इश्यू साइज: ₹4,275 करोड
 • शेअरची किंमत: ₹542 ते ₹570
 • तुम्हाला कमीतकमी 26 शेअर्ससाठी अर्ज करावा लागेल.
 • 26 शेअर्सची किंमत ₹14,820 (₹570 x 26) असेल.
 • भारती हेक्साकॉमची स्थापना 1995 मध्ये दूरसंचार सेवा पुरवण्यासाठी झाली.
 • कंपनी राजस्थान आणि ईशान्य भारतात कार्यरत आहे.
 • एअरटेल ब्रँड अंतर्गत, ते फिक्स्ड-लाइन, ब्रॉडबँड आणि मोबाइल सेवा देतात.
 • तुम्ही जर दोन सिम कार्ड वापरत असाल तर तुमच्याकडे एक एयरटेल सिम कार्ड नक्कीच असेल.
 • कंपनी सतत बाजारपेठेतील उत्पन्न आणि बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
 • खर्च कमी करण्यासाठी आणि नफा राखण्यासाठी ते खर्च ऑप्टिमायझेशनचा वापर करतात.
 • ते सतत नेटवर्क विस्तारामध्ये गुंतवणूक करत आहेत.
 • ते डिजिटल पायाभूत सुविधा आणि सेवांसाठी एअरटेल ब्रँडचा पुरेपूर लाभ घेत आहेत.
 • 30 सप्टेंबर 2023 पर्यंत, भारती हेक्साकॉमकडे 88,000 पेक्षा जास्त रिटेल टच पॉइंट्ससह एक विस्तृत वितरण नेटवर्क आहे.

1. कर्ज कमी करणे:

 • कंपनी ₹1,500 करोड पर्यंत कर्ज फेडण्यासाठी आयपीओतून उभारलेल्या निधीचा वापर करेल.
 • यामुळे कंपनीचे वित्तीय आरोग्य सुधारण्यास मदत होईल आणि त्याचा व्याज खर्च कमी होईल.

2. भविष्यातील वाढीसाठी निधी उभारणे:

 • कंपनी ₹2,775 करोड पर्यंत भविष्यातील वाढीसाठी निधी उभारण्यासाठी आयपीओतून उभारलेल्या निधीचा वापर करेल.
 • यामध्ये 5G स्पेक्ट्रम लिलावासाठी बोली लावणे, नेटवर्क विस्तार आणि नवीन तंत्रज्ञानात गुंतवणूक करणे समाविष्ट आहे.
YEARREVENUEEXPENCESProfit After Tax
2021₹4704.3₹3549.9 ₹1033.9
2022₹5494.0₹3591.2 ₹1674.6
2023₹6719.2₹3793.3 ₹549.2
Dec.2023₹5420.8₹2737.4 ₹281.8
₹ करोंडमध्ये 
अलॉटमेंट तारीख8 एप्रिल 2024
लिस्टिंग तारीख12 एप्रिल 2024
IPO प्रकारऑफर फॉर सेल (OFS)
OFS आकार₹4,275 करोड
शेअरची किंमत बँड₹542 ते ₹570
लॉट आकार26 शेअर्स
अंतिम बोली0.34x
अलॉटमेंट तारीख8 एप्रिल 2024
शेअर अलॉटमेंटची सूचना9 एप्रिल 2024
रिफंड तारीख10 एप्रिल 2024
ट्रेडिंगसाठी शेअर्स जमा12 एप्रिल 2024

सुनील भारती मित्तल हे Bharti Hexacom (Airtel) चे संस्थापक आहेत

Bharti Hexacom ही Bharti Airtel ची उपकंपनी आहे जी भारतातील राजस्थान आणि ईशान्येकडील मंडळांमध्ये मोबाईल, फिक्स्ड-लाइन टेलिफोन आणि ब्रॉडबँड सेवा प्रदान करते. ते एअरटेल ब्रँड अंतर्गत काम करतात.

सर्वोत्तम गुंतवणूक कोणती? स्टॉकस,एफडी,का सोने? हा आमचा लेख नक्की वाचा….

Leave a Comment